नाविन्यपूर्ण

शुभेच्छा संदेश

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या आधिपत्याखालील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यात शासनाच्या क्रीडा विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारी वेबसाईट प्रसिद्ध केलेली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व क्रीडा विषयक उपक्रम व योजनाची माहिती सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक यांना माऊस च्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमास मी नाशिक विभागाचा उपसंचालक या नात्याने मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

जे. पी. आधाने उपसंचालक / क्रीडा व युवक सेवा, नाशिक

ताजा बातम्याजिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.

शाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी

सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.